⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 10 ते 60 हजार रुपये प्रतिवर्ष शिष्यवृत्ती!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३ । इन्फोसिसचे सहसंस्थापक कुमारी शिबुलाल आणि एस. डी. शिबुलाल यांनी स्थापन केलेल्या दामोदरन फाउंडेशनद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दारिद्य रेषेखालील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी सरोजिनी दामोदरन फाउंडेशनमार्फत ‘महाराष्ट्र शिष्यवृत्ती कार्यक्रम 2023’ सुरू करण्यात आला आहे.

या अंतर्गत इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी सन 2023 च्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत 85 टक्के तर दिव्यांग विद्यार्थ्यांना 75 टक्के अशा गुणांची अट आहे. विद्यार्थ्यांचे कुटुंब हे दारिद्र रेषेखालील असावे. या नियम व अटीत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.

या संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी आता अर्ज मागविण्यात आले आहे. महाराष्ट्रात शिकत असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी होणार आहे त्यांना अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षांसाठी दहा हजार रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. जर त्यांची प्रगती उत्तम राहिली तर त्यांना त्यांच्या आवडीच्या पदवीसाठी अभ्यासक्रमासाठी दहा ते साठ हजार रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाणार आहे.

विद्यार्थी www.vidyadhan.org या वेबसाईटला भेट देऊन ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहिती साठी vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com येथे संपर्क साधावा.