प्रवाशांना दिलासा! जळगाव, भुसावळ मार्गे धावणार या विशेष गाड्या, कुठून कुठपर्यंत असणार?

मार्च 11, 2026 2:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे सीएसएमटी मुंबई-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-दानापूर, पुणे-दानापूर तसेच पुणे-गोरखपूरदरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. विशेष या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला असून यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

train

गाडी क्रमांक ०१०७९ ही विशेष गाडी १० ते ३१ मार्चदरम्यान दररोज सीएसएमटी येथून रात्री १०:३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०१०८० ही विशेष गाडी १२ मार्च ते २ एप्रिलदरम्यान गोरखपूर येथून दुपारी २:३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १२:४० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११४३ ही विशेष गाडी १० ते ३१ मार्चदरम्यान दररोज एलटीटी येथून सकाळी १०:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११४४ ही विशेष गाडी ११ मार्च ते २ एप्रिलदरम्यान दानापूर येथून रात्री ९:३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ७:४५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४४९ ही विशेष गाडी १० ते ३१ मार्चदरम्यान दररोज पुणे येथून दुपारी ३:३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे २:४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४५० ही विशेष गाडी १२ मार्च ते २ एप्रिलदरम्यान दानापूर येथून पहाटे ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:१५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४१५ ही विशेष गाडी १० ते ३१ मार्चदरम्यान दररोज सकाळी ६:५० वाजता पुणे येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:०० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४१६ ही विशेष गाडी ११ मार्च ते १ एप्रिलदरम्यान गोरखपूर येथून सायंकाळी ५:३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ३:१५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

या स्थानकांवर थांबा असेल?
या सर्व गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, कानपूर, लखनौ, गोंडा आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now