सोमवार, डिसेंबर 4, 2023

नागरिकांना लक्ष द्या : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमीत्त शहरातील हे रस्ते राहणार बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२३ ।  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कित्येक आमदार व खासदार हे जळगाव शहरात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मंगळवारी येणार आहेत. अशावेळी जळगाव शहरातील प्रमुख रस्ते हे बंद करण्यात येणार आहेत.

आकाशवाणी चौक ते गोविंदा रिक्षा स्टॉप पर्यंतचा रस्ता हा बंद ठेवण्यात आला आहे. दुपारी 12 ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंगळवारी हा रस्ता बंद असणार आहे. या रस्त्यावर कार्यक्रमाकरिता येणाऱ्या लाभार्थ्यांचीच वाहने तसेच एसटी बस, रुग्णवाहिका या वाहनांना प्रवेश मिळणार असून जळगाव शहरातील नागरिकांना व इतर वाहनधारकांना पर्यायी रस्त्यावरून प्रवास करता येणार आहे.

पर्यायी मार्ग

  • महाबळ, एम जे कॉलेज, तसेच गावात येणा-या नागरीक व वाहन धारक यांनी → आकाशवाणी चौक प्रभात चौक महेश चौक रिंगरोड मार्गे गोकुळ स्वीट मार्ट शाहु – महाराज रूग्णालय नुतन मराठा कॉलेज समोरून गोविंदा रिक्षा स्टॉप मार्गे यामार्गाचा जाण्यासाठी व वाहतुकीसाठी उपयोग करावा.
  • जळगाव शहरातुन एम जे कॉलेज, महाबळ, भुसावळ, धुळेकडेस जाणा-या नागरीक व वाहन धारक यांनी टॉवर चौक चित्र चौक बेंडाळे चौक सिव्हील हॉस्पीटल पांडे चौक- – सिंध्दी कॉलनी – ईच्छादेवी – आकाशवाणी चौक यामार्गाचा येण्यासाठी व वाहतुकीसाठी उपयोग करावा.

जळगाव शहरातील वाहतुक मार्गाचे ताप्तुरत बदल करण्यात आला असल्याने नागरीकांच्या व वाहनधारकांच्या सोयीसाठी सदर बातमी प्रसिध्द करावे असे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे कळविण्यात येत आहे.