जळगाव शहरगुन्हे

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना ! चक्क निवृत्त पोलीस अधिकऱ्याच्या घरात डल्ला, लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमध्ये चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसत असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढताना दिसत आहे. याच दरम्यान, चोरट्यांनी चक्क निवृत्त पोलीस अधिकऱ्याच्या घरात डल्ला मारला आहे. जळगाव शहरातील निमखेडीरोड भागातील स्वामी समर्थ पार्क परिसर येथील निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक मगन वनाजी मोहिते यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख ७३ हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ४० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chori 2

मगन मोहिते हे २२ मार्च रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह शिरपूर (जि. धुळे) येथील मूळ गावी शेतीच्या कामासाठी गेले होते. यादरम्यान त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. सोमवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या वैशाली कैलास भोसले यांनी मोहिते यांच्या पत्नीला फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. मोहिते कुटुंबीयांनी तत्काळ शिरपूर येथून जळगाव गाठले असता त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेला आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी या वस्तू लांबवल्या
११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे, १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ७ भार वजनाच्या चांदीच्या जोडव्या व साखळ्या, ७३,००० रुपये रोख (५०० व २०० च्या नोटा) अश्या एकूण २ लाख ४० हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button