थंडीचा जोर काहीसा ओसरणार, गारठ्यासह वाऱ्याचा वेग झाला कमी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२२ । राज्यात सर्वत्र किमान तापमानात घसरण झाली असून कडाक्याची थंडी जाणवत आहे. शनिवारी जळगावात राज्यातील सर्वाधिक कमी म्हणजे ७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आठवड्याच्या तुलनेत शनिवारी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावल्याने दिवसाच्या गारठ्यापासून दिलासा मिळाला. जळगाव विभागात दि ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान थंडीचा जोर किंचित कमी होण्याची शक्यता.
शनिवारी जळगावात सर्वाधिक ७.३ अंश तर नागपुरात ७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. कमाल तापमान २७ अंशांवर असल्याने रात्रीच्या गारठ्यासोबत दिवसाही वातावरण थंडच होते. शनिवारी वाऱ्याचा वेग ताशी सात किमीपर्यंत खाली आलेला होता. त्यामुळे दिवसा गारठा कमी जाणवला. उत्तर महाराष्ट्रापाठोपाठ पूर्व विदर्भात थंडीची लाट तीव्र झालेली असल्याने नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात पारा सात अंशांपर्यंत खाली आलेला आहे. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा वेग मंदावल्याने गारठा कमी झालेला आहे; परंतु तापमान सात अंशांपर्यंत खाली असल्याने रात्री थंडी जाणवते.
दरम्यान, जळगावात आज म्हणजेच ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत थंडीचा जोर किंचित कमी होण्याची शक्यता. किमान तापमानात २ ते ४ डिग्रीने तर किमान तापमानात ३ ते ४ डिग्रीने तापमानात वृद्धी होईल. सकाळी ११ नंतर उष्णता जाणवेल मात्र पहाटे थंडी जाणवेल. किमान तापमान ९ ते १५ डिग्री दरम्यान राहील तर किमान तापमान 30 ते 33 डिग्री दरम्यान राहील.
हे देखील वाचा :
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- महाराष्ट्रातील या भागात पावसाचा अंदाज: शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला..