भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदात होणार वाढ ? आता असणार ३ जिल्हाध्यक्ष?
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । भारतीय जनता पक्षाचे सध्या दोन जिल्हाध्यक्ष आहेत. एक म्हणजे जळगाव शहर जिल्हाध्यक्ष तर दुसरा म्हणजे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष. मात्र आता भारतीय जनता पक्षाचा तिसरा रावेर ग्रामीण जिल्हाध्यक्ष होऊ शकतो. असे म्हटले जात आहे. याबाबत लवकरच प्रदेश सचिव राजेश पांडे हे पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहेत.
या घडीला जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे तर जळगाव शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आहेत. मात्र आता लोकसभा मतदारसंघ निहाय दोन अध्यक्ष करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाचा आहे. अशावेळी जळगाव ग्रामीण व रावेर ग्रामीण असे भारतीय जनता पक्षाचे दोन असू शकतात अशी चर्चा आहे.
जळगाव शहर महानगर प्रमुख म्हणजे जिल्हा जळगाव शहर जिल्हाध्यक्ष हे पद भारतीय जनता पक्षातर्फे काढण्यात येणार नाही असेही म्हटले जात आहे. अशावेळी जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग देखील सुरू आहे. कित्येक जण इच्छुक आहेत. अशावेळी नक्की खांदा पलट होतो की जे आहेत तेच राहतात हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.