⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जात, पात का भेद ना हो, बस सिर्फ रहे इंसान ऐसा हिंदुस्ता बनाओ…, मुशायरा गाजला

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । कोई बना इस जगमे पापी कोई बना नेक, रस्ता सबका अलग अलग है, मगर मंजिल सबकी एक, गंगा किनारे कोई अजान दे कोई करे स्नान, इक माटी के सारे बने है सबका लहु है लाल, सबके दिल कि एक ही धडकन सासो के सरताज, जात, पात का भेद ना हो बस सिर्फ रहे इंसान ऐसा हिंदुस्ता बनाओ… हिंदु, मुस्लिम, शिख, इसाई, फुलोका गुलदान, दुनिया भरमे सबसे अलग हो मिट्टी की पहचान, अमरीका भी तकता रहे, हैरत मे रहे जापान, ऐसा हिंदुस्ता बनाओ… ऐसा हिंदुस्ता… या नुरी अजीज (जालना) च्या राष्ट्रीय एकात्मतेच्या काव्यपंक्तीनी आणी इतर कवितांनी उपस्थित श्रोत्यांची चांगलीच दाद मिळवली, राष्टीय एकात्मेवर आधारित भव्य मुशायरा कार्यक्रम ( कवी संमेलन) संपन्न झाले.

यावल येथील डॉ. ज़ाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व जुनियर कॉलेज’च्या भव्य प्रागंणात ६ रोजी राष्टीय एकात्मेवर आधारित भव्य मुशायरा (कवी संमेलन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मुशायरा कार्यक्रमात जिल्हा, व राज्यसह इतर राज्यातील नामवंत कवींची (शायर) उपस्थिती होते. तर सावदा येथील डायमंड इंग्लिश मेडियम शाळेचे अध्यक्ष डॉ. हारून शेख हे मुशायरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रात्री आठला होणाऱ्या या मुशायरा कार्यक्रम मात्र उशीरा सुरू झाला. तरी ही ऊर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची उपस्थिती हे लक्ष वेधणारी होती. दिप प्रज्वलन रावेर यावल विधानसभेचे शिरीष चौधरी यांचे पुत्र धंनजय चौधरी, येथील नँशनल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी मो. ताहेर शेख चाँद, कॉंग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीर खान, जळगावचे सामाजीक कार्यकर्ते फारूक शेख, शेख रफिक अध्यक्ष शिकर एनजीओ भुसावळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस एजाज् मलीक, जिल्हा परिषदचे शिक्षण तथा आरोग्य सभापती रविन्द्र पाटील, यावलचे तत्कालीन नगरसेवक असलम शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मनीयार यांच्यासह आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमात नईम अख्तर खादमी (बऱ्हाणपूर), रागीब ब्यावली (जळगाव), नईम राशीद, (बऱ्हाणपूर) डॉ. जाहीद नय्यर (अमरावती), कवियत्री शायरा नुरी अजीज (जालना), कमर साकी (रतलाम ), अक्रम कुरेशी (जळगाव), माईल पालध्वी, कलीम गडबड (मालेगाव), अहद अमज़द ( बऱ्हाणपूर) साबीर मुस्तुफाआबादी, कासीम उमर (जळगाव) यांच्या सह येथील स्थानिक शायर ( कवी ) हबीब मंज़र, रहीम रजा, अशफाक निज़ामी, शाहीद मुफट, नौशाद ब्यावली इत्यादी कवींची उपस्थिती लाभली.

मुशायरा कार्यक्रम हबीब मंज़र, अशफाक निज़ामी, शेख अशफाक यांच्या मार्गदर्शना खाली झाला. कार्यक्रमाचे सुरुवातीचे सूत्रसंचालन साबीर मुस्तुफा आबादी व हबीब मंज़र यांनी केले. तर मुशायऱ्याचे सूत्रसंचालन डॉ. जलीलुल रहेमान बऱ्हाणपूर यांनी केले. युवा सामाजिक कार्यकर्ते मुशायरा कमेटी चे शाहरुख खान व शाहीद खान सह शेख फिरोज, सैय्यद मुस्ताकअली, मोईनखान यांनी मुशायरा कार्यक्रम आयोजीत केला होता .