⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिवस उत्साहात साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२४ । जागतिक दूरसंचार संघटनेची स्थापना १७ मे १८६५ रोजी झाली. त्या अनुषंगाने येथील गोदावरी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी जळगाव येथील निष्णात दूरसंचार तंत्रज्ञ श्रीमती सुजाता गायधनी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या सोबत डीन अकॅडमीक्स डॉ. हेमंत इंगळे ( इ अँड टी सी इंजी. विभाग प्रमुख), रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव तसेच आयआयसी कन्व्हेनर प्रा. अतुल बर्‍हाटे आणि आयक्यूएसी समन्वयक प्रा. तुषार कोळी तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग व विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. आर. व्ही. पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

त्यानंतर कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता श्रीमती सुजाता गायधनी यांनी जागतिक दूरसंचार दिनाचे महत्त्व व दूरसंचार तंत्रज्ञानात होत असलेले बदल यावर भाष्य केले. दूरसंचार तंत्रज्ञानाचे उपयोगाने जगातील लोक एकमेकांच्या जवळ येऊ लागलीय. डिजिटल इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या एकल कल्पनेअंतर्गत तरुण पिढीला दूरसंचार क्षेत्रामधील संधी खुणावत आहेत असे त्यांनी नमूद केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. आर. व्ही. पाटील यांनी मेहनत घेतली त्यांना विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक आर. व्ही. पाटील यांनी केले.