..तर सभेतून अर्धे लोक निघून गेले नसते – एकनाथराव खडसे

सप्टेंबर 21, 2022 2:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री व चार कॅबिनेट मंत्री यांनी मिळून जी सभा घेतली त्या सभेत जर खरंच मनापासून लोक आले असते तर सभा अर्धवट सोडून उठून गेले नसते. अशी टीका आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

khadse and shinde jpg webp

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुक्ताईनगर मध्ये बोलवून मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर चार कॅबिनेट मंत्री देखील हजर होते. अशावेळी मुक्ताईनगर तालुक्याला किंबहुना मतदारसंघाला काहीतरी विकासाचं मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही सभा केवळ आणि केवळ नाथाभाऊ विरुद्ध गरळ ओकण्यासाठीच होती. असे खडसे म्हणाले.

याचबरोबर अशा कित्येक सभा मी घेतल्या आहेत. माझ्या वाढदिवसाची खूप मोठी सभा झाली होती. मात्र माझ्या सभेवेळी कधी लोक सभा अर्धवट सोडून गेले नाहीत. झालेली गर्दी हि खोक्यांची गर्दी होती. असेही एकनाथराव खडसे म्हणाले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now