जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव येथे आत्या-मामांना चुलत भाच्यांनी गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्षभर मेहनत घेऊन पीक घेतलेला १५० टन ऊस तीन भाच्यांनी परस्पर चोरून नेत विक्री केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या माया भारत बोरसे (देशमुख) वय-५० वर्षे या सध्या वारेगाव, ता.फुलंबी, जि.औरंगाबाद याठिकाणी पती भारत दिनकर बोरसे यांच्यासह राहतात. माया बोरसे यांना वडीलांकडुन वडीलोपार्जीत शेती चितेगाव येथे मिळाली आहे. शेतीचा शेतगट क्र.९ अ असा असून क्षेत्र ८४ आर एवढे आहे. दोन्ही पती पत्नी चितेगाव येथे येवून जावुन शेती व्यवसाय करतात. पंजाब वसंतराव देशमुख, बिपीन वसंत देशमुख, दुर्गेश वसंत देशमुख सर्व रा. चितेगाव, ता. चाळीसगाव हे नात्याने त्यांचे चुलत भाचे आहेत.
बोरसे दाम्पत्याने २ एकर शेतात ऊसाचे पिक लावलेले होते व त्याची मशागत करून आज पावेतो त्याचे संगोपण केले. सध्या त्यांच्या शेतातीतल ऊस तोडणीला आलेला होता. परंतू त्यांची तब्बेत बिघडल्यामुळे दोन्ही दि.८ डिसेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ पावेतो घरीच होते. दि.१० रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते शेतात आले असता तेथे त्यांना शेतातील ऊसाचे पिक कोणीतरी कापणी करुन घेवुन गेल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी चितेगाव येथील मुकादम अरुण चांगदेव मोरे यांना विचारपुस केली असता, पंजाब वसंत देशमुख, बिपीन वसंत देशमुख आणि दुर्गेश वसंत देशमुख सर्व रा.चितेगाव, ता.चाळीसगाव अशांनी शेतातील संपुर्ण २ एकर शेतात पेरलेला अंदाजे १०० से १५० टन ऊस किंमत अडीच ते ३ लाख रुपयांचा मजुरांच्या मदतीने कापणी करुन चोरी करुन घेवुन गेले आहेत.
आत्याच्या शेतातील अंदाजे तीन लाखांचा ऊस कापून नेत चोरी केल्याप्रकरणी माया बोरसे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी चाळीसगाव पोलिसात पंजाब वसंत देशमुख, बिपीन वसंत देशमुख आणि दुर्गेश वसंत देशमुख सर्व रा.चितेगाव, ता.चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक संजय ठेंगे करीत आहेत.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?