---Advertisement---
जळगाव शहर गुन्हे

जळगाव शहरातील महादेवाच्या मंदिरात चोरट्याची हातसफाई ; चोरटा CCTV कॅमेरात कैद

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२३ । जळगावमध्ये चोरांनी धुमाकूळ घेतला असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच जळगाव शहरातील महादेवाच्या मंदिरात चोरट्याने हातसफाई केली. मंदिरातील पितळी त्रिशूल, तांब्याची कळशी आणि तांब्याचा नाक असा एकूण ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला आहे. दरम्यान या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mahadev mandir chori jpg webp webp

जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगरात महादेव मंदिर आहे. या मंदिरात राजेश रघुवीर गुप्ता यांच्या खाजगी जागेत बांधण्यात आले आहे. २१ जून रोजी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने वॉल कंपाऊंडवरून उडी घेत मंदिरातील तांब्याचा कळशी, तांब्याचा नाग आणि पितळी त्रिशूल असा एकूण ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

---Advertisement---

या संदर्भात व्यापारी राजेश गुप्ता यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुरुवार २२ जून रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---