जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । शहरातील अयोध्यानगर परिसरात असलेल्या रौनक कॉलनीत राहणारे एक व्यावसायिक सासूच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिक येथे गेले होते. पत्नी व मुले सासरी असल्याची संधी पाहत चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रोख रकमेसह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
अयोध्या नगरात असलेल्या रौनक कॉलनीत नरेंद्र ओमप्रकाश दुबे हे पत्नी व मुलांसह राहतात. ट्रान्सपोर्ट नगरात त्यांचे दुकान आहे. दि.८ रोजी नरेंद्र यांच्या सासू पुष्पादेवी शर्मा यांचे निधन ते अस्थी विसर्जनासाठी नाशिक येथे गेले होते. नरेंद्र यांचे सासर जळगावातच असल्याने त्यांची पत्नी व मुले तिकडे गेले होते.
दि.११ रोजी नरेंद्र दुबे यांची मुलगी व पत्नी घरी नवरात्रीसाठी देवीची ज्योत लावण्यासाठी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी याबाबत लागलीच नरेंद्र जैन यांना कळविले. जैन नाशिक वरून दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगावात दाखल झाले चोरट्यांनी घरातील कपाट रोख रक्कमसह सोन्या-चांदीचे दागिने असलेला १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय अमोल मोरे करीत आहे.