जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, दिव्यकांत विक्की बागडे (वय-१७) रा. जाखणी नगर, कंजरवाडा, जळगाव. १० एप्रिल रोजी रात्री १० वाजता धनश्याम बागडे याला कासमवाडी येथे ललित दिक्षीत, भोजा आणि मयूर (पुर्ण नाव माहिती नाही) सर्व रा. कासमवाडी जळगाव यांनी काहीही कारण नसतांना मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दिव्यकांत बागडे हा गेला असता तिघांनी मारहाण केली. यात ललित दिक्षीतने त्याच्या हातातील तिक्ष्ण हत्याराने वार करून दिव्यकांत याला जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दिव्यकांतची आई निलम बागडे यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली व जिंवत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी ११ एप्रिल रोजी दिव्यकांत बागडे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित ललित दिक्षीत, भोजा आणि मयूर (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. कासमवाडी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार हे करीत आहेत.