जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२३ । सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसाने धुमाकूळ घेतला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात काल सतत सुरु असलेल्या पावसाने बहुतेक ठिकाणी नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आहे. अशाच एका पुरात तरुण वाहून गेल्याची घटना काल रावेर तालुक्यात घडली. रावेर तालुकयातील नदी नाल्यांना पूर्ण येऊन नागरिकांना बराच धोका निर्माण झाला आहे.
रावेर तालुक्यातील वाघोड गावावरून मोरगाव बुद्रुक गावाकडे येणारी नदी दुथडी भरून वाहत होती. रावेर वरून मोरगावकडे जाण्यासाठी सर्व मार्ग बंद होते.
गजानन कोळी (वय ४२ वर्ष) हे मांगी तालुका रावेर येथील रहिवाशी आहे. मोरगाव बुद्रुक येथील सासुरवाडी असलेले गजानन कोळी हे मोरगाव बु.येथे जाण्यासाठी वाघोड गावावरून जात होते. दुपारी चार वाजता पाऊस थांबल्यानंतर त्यांनी लागवड गावावरून मोरगावकडे जाणारा पायी रस्त्याचा वापर केला.यावेळी वाघोड येथील रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याचा वापर केला.
परंतु बाजूच्या नदीला पूर आल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी वाहत होते. पाण्यामधून मार्ग काढत असताना गणेश कोळी यांचा पाय घसरून तो पाण्याचा प्रवाह बरोबर नदीमध्ये वाहून गेला. वाहून जातानांचा व्हिडिओ तिथे असलेल्या काही तरुणांच्या मोबाइलला मध्ये रेकॉर्ड झाला होता. व्हिडिओत सदरचा इसम नदीच्या पुरामध्ये वाहून जाताना दिसत आहे.
परंतु तो इसम काही अंतरावर वाहून गेल्यावर त्याला पोहता येत असल्यामुळे सुखरूप बचावला व मोरगाव बु. येथे सासुरवाडीला ठणठणीत चालत आला. यामुळे सर्वांनी सुटकेचा निः श्वास टाकला.