⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | अंघोळ करताना तापीपात्रात बुडाला तरुण

अंघोळ करताना तापीपात्रात बुडाला तरुण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । चोपडा तालुक्यातील सनपुले येथील १९ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्य झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. देवेंद्र पवार (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे.

देवेंद्र हा शेतीचे काम करून अंघोळ करण्यासाठी नदीवर गेला होता. त्याला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नदी पात्रात मासेमारी करणाऱ्या एका महिलेला दिसली. त्या महिलेने गावात निरोप दिल्यानंतर नागरिकांनी धाव अर्ध्या तासांनी त्याला बाहेर काढले. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवविच्छेदन करून रात्री नऊ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ असा परिवार आहे. सनपुले येथील पांडुरंग कोळी, दिनेश कोळी, कैलास माळे, नाना माळे, अतुल पाटील, वासुदेव कोळी, समाधान कोळी, काशिनाथ पवार यांनी मदतकार्य केले. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह