---Advertisement---
जळगाव जिल्हा

स्त्रीरोग तज्ञ संघटनेचे कार्य गौरवास्पद – डॉ.उल्हास पाटील

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । समाज जनजागृती व स्त्रीरोग क्षेत्रातील नवनवीन बदल स्त्रीरोग तज्ञांना सविस्तरपणे समजावून सांगणे, याशिवाय सोसायटीतर्फे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविणे, हे कार्य खरोखरच गौरवास्पद असून जळगाव स्त्रीरोग संघटनेला भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी दिल्या.

निमित्त होते नाशिक येथे शुक्रवार दि. ९ जून रोजी पार पडलेल्या ३६ व्या राज्यस्तरीय अमोग्ज परिषदेतर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्याचे. यंदाच्यावर्षी ३६ व्या अमोग्ज या परिषदेतर्फे जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेला बेस्ट सोसायटीचे पारितोषिक जाहीर झाले. सन २०२२-२०२४ या काळासाठी नियुक्त झालेल्या अध्यक्षा डॉ.सीमा पाटील आणि सचिव डॉ.दिप्ती पायघन यांच्या नेतृत्वात संघटनेने जळगाव जिल्हा स्त्रीरोगतज्ञासाठी नवनवीन मार्गदर्शनपर कार्यशाळा, व्याख्यानाचे आयोजन आणि समाज जनजागृतीसाठी राबवलेले उपक्रम यांची राज्यस्तरीय स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेने दखल घेतली. राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष डॉ हृषीकेश पै यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.बेस्ट सोसायटी सोबतच सामाजिक जाण ठेवून स्त्रियांच्या आरोग्यासाठी राबवलेल्या उपक्रमांसाठी अमोग्ज चॅम्पीयन सोसायटीचे मानपात्र आणि बक्षीस देखील जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेला मिळाले.

ulhas patil 1 jpg webp webp

या यशाबद्दल अध्यक्षा डॉ सीमा पाटील आणि सचिव डॉ दिप्ती पायघन आणि टिम जॉग्स २०२२-२०२४ यांचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, आयएमए जळगाव अध्यक्ष डॉ सुनील नाहाटा व सचिव डॉ तुषार बेंडाळे यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---