जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । अंत्यसंस्कार करून घरी जात असतानाच बसच्या धडकेत महिलेचा जीवन प्रवास संपला. तर झाल अस कि, अत्यसंस्कार करून घरी जात असलेल्या वृध्देला बसने धडक दिली. यावेळी तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीबाई नामदेव जोशी (वय-६८) रा. जोशीपेठ जळगाव असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. लक्ष्मीबाई जोशी यांच्या मुलीच्या नातेवाईकांचे चोपडा येथे निधन झाले होते. त्यामुळे आज सकाळी चोपडा येथे अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या. अंत्यसंस्कार आटोपून त्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव बसस्थानकात उतरल्या. पायी जात असतांना त्यांना धुळे आगाराच्या बसने धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.