---Advertisement---
जळगाव जिल्हा

मुंबईहुन ‘या’ शहरासाठी धावणार साप्ताहिक ट्रेन ; भुसावळसह जळगाव स्थानकावर थांबेल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२३ । देशातील करोडो लोक दररोज रेल्वेने प्रवास केला. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर नेहमीच रेल्वेला पसंती मिळते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच गतिमान आणि सुरक्षित आहे. तसेच रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा सुद्धा आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी राहते. दरम्यान, रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वकडून अनेक गाड्या चालविल्या जात आहे.

ltt mau special train jpg webp

दरम्यान, आता रेल्वेने एक साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते उत्तर प्रदेश मधील मऊ दरम्यान एक साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार आहे. रेल्वे विभाग गाडी क्रमांक 15181 ही ट्रेन अप मार्गांवर आणि गाडी क्रमांक 15182 ही डाऊन मार्गावर सूरू करणार आहे. नवीन ट्रेन मऊ स्थानकापासून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलपर्यंत सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजेच ही गाडी भुसावळसह जळगाव स्थानकांवर थांबेल. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे

---Advertisement---

15181 मऊ-एलटीटी स्पेशल ट्रेन १६ डिसेंबरपासून दर शनिवारी मऊ येथून रात्री १०.१५ वाजता धावेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता एलटीटी पोहोचेल. तसेच 15182 दर सोमवारी, 18 डिसेंबर रोजी सकाळी 11.10 वाजता एलटीटीहून सुटेल, तर दुसऱ्या सायंकाळी 6.30 वाजता मऊ येथे पोहोचेल. ट्रेनमध्ये एकूण २१ डबे आहेत. सात स्लीपर कोच, सहा एसी तीन इकॉनॉमी कोच, दोन एसी दोन डबे, चार जनरल क्लास डबे आणि एक एसएलआरडी क्लास कोच आहेत.या गाडीमुळे मुंबई ते उत्तर प्रदेश चा प्रवास अधिक गतिमान होईल अशी आशा असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या स्थानकांवर थांबेल
एलटीटी, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, हरदा, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, प्रयाग, फुलपूर, जंघाई, मडियाहुन, जौनपूर, शहागंज, खोरासन रोड, आझमगड, मुहम्मदाबाद आणि मऊ.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---