जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । शहरासाठी पाणीपुरवठा करणार्या वाघुर पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या मेहरूण स्मशानभूमीजवळ गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
मेहरूण स्मशानभूमी रस्त्यावर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर जलवाहिनीच्या गळतीच्या दुरूस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे. दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला असून, एकदिवस उशिराने होणार आहे. दि.19 रोजीचा पाणीपुरवठा 20 रोजी होईल. तसेच दि.20 रोजीचा 21 रोजी तर 21 रोजीचा पाणीपुरवठा 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.