जळगाव जिल्हा

आवर्तनाच्या 24 तासांत गिरणेतील जलसाठा ‘इतक्या’ टक्क्यांनी घसरला, इतका आहे शिल्लक जलसाठा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२४ । गिरणा धरणातून रविवारी सकाळी ६ वाजता दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडल्यानंतर २४ तासातच गिरणा धरणातील जलसाठा २ टक्क्यांनी घसरला आहे. सोमवारी सकाळी हा साठा ३९.९८ टक्क्यांवर आला आहे. रविवारी सकाळी पिण्यासाठी दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यानुसार १९० गावांना तृप्तीचा घोट पाजला जाणार आहे.

२ हजार क्युसेस वेगाने या पाण्याचा विसर्ग होत असताना गिरणा धरण मात्र आटत चालले आहे. पंधरा दिवसांपूर्वी ४४ टक्क्यांवर असणारे गिरणा धरण गत आठवड्यात ४२ टक्क्यांवर आले होते. सोमवारी हा साठा ३९.९८ टक्क्यांवर आला. आठ दिवसात या साठ्याची टक्केवारी पस्तीशीच्या घरात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यात १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तशातच सोमवारी भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती, पिंप्री, खराडी, डोणदिगर या गावांना पाणीपुरवठा सुरु आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button