जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणाऱ्याच्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखाने पिस्तूलसह ताब्यात घेतले आहे. या प्रकणी रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात एक संशयीत गावठी पिस्तूल बाळगून दहशत करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोह सुधाकर अंभारे, पोह महेश महाजन, पोना विजय पाटील, पोना प्रितम पाटील, पोकॉ सचिन महाजन, पोकॉ पंकज शिंदे यांना रवाना केले. दरम्यान, खंडेराव नगर भागात अश्विन विजय हिरे (वय २०) हा गावठी पिस्तोल बाळगत दहशत करीत असल्याचे आढळून आले. अनाधिकृत अवैध शस्त्र बाळगून दहशत पसरवल्या प्रकरणी त्याच ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील १ गावठी बनावटीची पिस्तोल ३० हजार रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.