जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । भुसावळकडून जळगावकडे सुसाट वेगाने निघालेल्या ट्रकने ओव्हरटेकच्या नादात समोरून येणाऱ्या डंपरला धडक दिली. यात दोन परप्रांतीय चालकांचा मृत्यू झाला तर एक सहचालक जखमी झाला. भुसावळ येथील महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळील राजस्थान मार्बलजवळ घडलीय. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली. मात्र, बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने क्रेनद्वारे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
याबाबत असे की, रिकामा ट्रक (जीजे.०२-झेडझेड.२९२२) हा भुसावळकडून जळगावकडे सुसाट वेगाने निघाला होता ट्रक रेल्वे उड्डाणपूल परिसरात असताना गोंभी (ता.भुसावळ) येथून आयुष प्रोकांत कंपनीसाठी खडी घेवून निघालेले डंपर (क्रमांक एमएच.१९-सीवाय.५३२७) समोरून येत होते. बाजूच्या वाहनाला ओव्हरटेकच्या नादात ट्रक समोर डंपरवर आदळला. ही धडक एवढी जोरदार होती की महामार्गावरील दुभाजकांचे देखील नुकसान झाले. दोन्ही वाहनाच्या दर्शनी बाजूंचा चेंदामेंदा झाला. या दोन्ही वाहनातील चालक, सहचालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, काही अंतराने मंगळवारी सकाळी दोघांचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी आयुष प्रोकांत प्रा.लि.कंपनीचे मेंटेनन्स विभागातील गंगाप्रसाद राजाराम निषद (रा.समदान अतशेला, ता.मेजा, प्रयागराज, इलाहाबाद) यांच्या फिर्यादीनुसार चालक तौसिफ रसूल कुरेशी विरोधात विविध कलमान्वये बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला.
तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश चौधरी करत आहेत.
दरम्यान, या अपघातात डंपर चालक ज्ञानप्रताप मेवालाल पटेल (वय ५८, टिकुरी समदन, मेजा रोड, प्रयागराज, उत्तरप्रदेश) व ट्रकचालक अयुब हुसेन सिद्दीकी (नंदासन, मेहसाना, गुजरात) यांचा मृत्यू झाला.तर सहचालक तौसिफ रसुलभाई कुरेशी (वय ३२, रा.नंदासन, मेहसाना, गुजरात) हे जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे देखील वाचा :
- शेतकऱ्यांना मिळणार 10000 रुपये; अर्थसंकल्पात होऊ शकते महत्त्वपूर्ण घोषणा?
- Gold Rate : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भाव घसरला
- चिंचोलीत होणार 650 खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु ; पालकमंत्री गुलाबराव पाटील
- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते, पण.. पालकमंत्री गुलाबराव पाटीलांचा मोठा खुलासा
- जळगावात भरधाव बुलेटस्वारकाने प्रौढाला उडविले, जागीच मृत्यू