---Advertisement---
जळगाव जिल्हा

डीप कोमात गेलेल्या बालिकेचा पुर्नजन्मच ; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या बालरोग तज्ञांचे प्रयत्न यशस्वी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । डोक्यावर फरशी पडून तब्बल दहा दिवस डीप कोमामध्ये गेलेल्या सात वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील पीआयसीयू विभागातील बालरोग तज्ञांनी केलेल्या शर्थीच्या उपचारांना यश आल्याने तीचा पुर्नजन्मच झाला आहे.

dip koma jpg webp

याबाबत माहिती अशी की, लहानपणीच वडीलांचे छत्र हरपलेली कविता संतोष गोपाळ ही सात वर्षीय बालिका आईसोबत जळगाव येथे राहते. तीची आई बांधकाम साईटवर रखवालदार म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. कविता ही या साईटवर खेळत असतांना अचानक तिच्या डोक्यावर फरशी पडली. ही फरशी पडताच कविता ही जागीच बेशुध्द झाली. तीला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आर्थिक परिस्थीती नसल्याने तिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात हलविण्यात आले.

---Advertisement---

कुटूंबाची आर्थिक परिस्थिती, वडीलांचे हरपलेले छत्र ह्या सार्‍या बाबी लक्षात घेऊन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या बालरोग विभागातील तज्ञांनी सामाजिक बांधिलकी जोपसत क्षणाचाही अवलंब न करता तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. उपचारादरम्यान कविताच्या डोक्याची दोन वेळा सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. तिच्या डोक्यातील टेम्पोरल बोनचे क्रॅक फ्रॅक्‍चर झाल्याचे तपासणीत निदान झाले. निदानानुसार उपचाराला सुरूवात झाली. तसेच मेंदूविकार तज्ञ डॉ. अनंत चोपडे यांनी देखिल तिची तपासणी करून उपचाराची दिशा योग्य असल्याचे मत व्यक्त केले.

दहा दिवसानंतर आली शुध्दीवर
घटना घडल्यानंतर उपचार सुरू होऊन देखिल आठ ते दहा दिवस कविता शुध्दीवर नव्हती. तसेच तिला झटके देखिल येत होते. ती डीप कोमात गेली होती. अखेर तिच्या मेंदूची एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा मेंदूविकार तज्ञ डॉ. अनंत चोपडे यांचे मत जाणून घेण्यात आले. त्यानुसार तिच्यावर औषधोपचार सुरू झाले. अखेर दहा दिवसानंतर बालरोग तज्ञांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले आणि कविता शुध्दीवर आली. तिचा जणू पुर्नजन्मच झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. उपचारासाठी बालरोग तज्ञ डॉ. उमाकांत अणेकर, मेंदूविकार तज्ञ डॉ. अनंत चोपडे, डॉ. दर्शन राठी, डॉ. रोहीणी देशमुख, डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे यांनी सहकार्य केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---