ट्रान्सफॉर्मरला लागली अचानक आग ; अन वाचा काय झाले ?
जळगाव लाईव्ह न्युज | ३० मे २०२२ । शहरातील कंजरवाडा भागातील वीज ट्रान्सफार्मरला अचानक आग लागल्याची घटना सोमवार, 30 मे रोजी दुपारी चार वाजता घडली. ट्रान्सफार्मरमधून आईल निघत असतांना अचानक आग लागली. थोड्याच वेळाने आगीने रौद्र रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे राहुल नेतलेकर यांनी तत्काळ उपमहापौर कुलभूषण पाटील यांना माहिती दिली व त्यानंतर अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अवघ्या काही मिनिटात अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही मिनीटात ही आग आटोक्यात आणण्यात आली.
जिल्हापेठ पॉवर हाऊस कक्षाचे अभियंता जयेश तिवारी, कर्मचारी महेश कळस्कर, लोंढे, नमो यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. कंजरभाट समाजाचे नितीन तमायचे, योगेश बागडे, विजय बागडे, शशिकांत बागडे, विवेक नेतलेकर, निखिल गारुगे, कपिल बागडे, राहुल तमायचे उपस्थित होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे कर्मचारी वाहन चालक-निवांत इंगळे, युसुफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी सहकार्य केले.