भारतीय रेल्वेत नोकरी लावून देण्याचे दाखवले आमिष.. वाचून बसेल तुम्हाला धक्का !

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२३ । भारतीय रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने अनेकांदा गंडा घालणार्‍या मुकूंद बापू मोरे (रा. चाळीसगाव) यास जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. संशयीताविरोधात एरंडोल न्यायालयाने वारंट जारी केले होते. न्यायालयीने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

नाशिकमधून आवळल्या मुसक्या
संशयित मुकूंद मोरे विरोधात एरंडोल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याने नोकरीच्या आमिषाने गंडा घातल्यानंतर संबंधिताना चेक दिला मात्र तो न वटल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होवून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले मात्र आरोपी गवसत नसल्याने न्यायालयाने त्याच्याविरोधात पकड वॉरंट जारी केले. आरोपी नाशिक परीसरात ओळख लपवून असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी त्यास अटक करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल जाधव, संदीप पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, चालक भरत पाटील आदींनी संशयीताच्या मुसक्या बांधत त्यास एरंडोल न्यायालयात हजर केले व न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.