जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । हॉस्टेलमधून एकाच वेळी तब्बल चार मोबाईल चोरट्यांनी लांबवून नेल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना शहरातील ख्वॉजामिया नगरातील हॉस्टेलमध्ये घडलीय, मात्र चोरी करणारा भामटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे.
शहरातील ख्वॉजामिया रोड, रामकृष्ण कॉम्प्लेक्स वुडलॅण्ड रेस्टॉरंट येथे वरच्या मजल्या होस्टेल आहे. त्याठिकाणी नोकरदार व शिक्षण घेणारे विद्यार्थी राहतात. दि. १९ जून रोजी सकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान होस्टेलमधील तीन रूम मधून एकुण चार मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. यात सुशिल सरजेराव पाटील, नगेंद्रसिंग, रामभाऊ सलूनवाला आणि चेतन पाटील याचे मोबाईल लांबविला आहे. सकाळी साडे ६.३० वाजता रामभाऊ सलूनवाला हे उठल्यावर त्यांना त्यांचा मोबाईल जागेवर आढळून आला नाही. त्यांनी मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असताना होस्टेलमधील इतर तीन जणांचेही मोबाईल चोरीस गेल्याचे उघड झाले.
त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीत चेक केले असताना सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हे मोबाईल लांबविल्याचे समोर आले. याबाबत सुशिल सरजेराव पाटील रा. भोरटेक ता. पाचोरा जि.जळगाव याने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी अडीच वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजराव हुडेकर करीत आहे.