⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अभय योजनेची मुदत १५ दिवस अजून वाढावा : महापौर जयश्री महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२३ । जळगाव शहरात अजूनही असे काही नागरिक आहेत जे अभय योजनेपासून वंचित राहिले आहेत. अशांना अजूनही अभय योजनेचा लाभ घ्यायचा आहे. म्हणून अभय योजनेची मुदत पंधरा दिवस वाढवावी अशी विनंती महापौर जयश्री महाजन यांनी पत्राद्वारे आयुक्त विद्या गायकवाड यांना केली आहे.

पत्रात म्हटले आहे कि, जळगांव शहर महानगरपालिकेतर्फे यापूर्वी मालमत्ता कराचा भरणा वाढविणे कामी अभय योजनेव्दारे शहरवासियांना मालमत्ता कराच्या शास्तीत दिनांक 28/02/2023 पर्यंत सुट दिलेली आहे व त्यास नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखिल मिळालेला असून वसूली उद्दीष्ट पुर्णत्वास दिसून “येत आहे. मात्र सदर योजने पासून काही नागरीक अपहार्य कारणास्तव वंचित राहिलेले असल्याचे समजते व त्यांचेकडून वारंवार सदर योजनेचा कालावधी वाढविणे बाबत मागणी होत आहे.

करीता आपणास नागरीकांच्या विनंतीस अनुसरुन सुचित करण्यात येते की, अभय योजने विषयी नागरीकांचा वाढता प्रतिसाद तसेच महानगरपालिकेचे कर वसूली उद्दीष्ट पुर्तीच्या उद्देशाने मालमत्ता कराच्या शास्तीत सुट देणे कामी अभय योजनेस किमान 15 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ करणे बाबत संबंधीतांना आदेश व्हावेत.