⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सूर्याचा प्रकोप सुरूच ; जळगाव पुन्हा ‘हॉटसिटी’

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । संपूर्ण मे महिना राज्यावर अवकाळी, पूर्वमोसमी सावट कायम असताना तापमानही उच्चांकी राहिले आहे. गेल्या पाच दिवसांत कमी झालेले तापमान पुन्हा वाढले आहे. यामुळे राज्यात जळगाव आणि अकोला या दोन हॉटसिटी ठरल्या आहेत.  बुधवारी जळगावात ४१.६ तर अकोल्यात ४१.८ अंश सेल्सिअस एवढी उच्चांकी तापमान नोंदवले गेले तर बुधवारी वाऱ्याचा वेग ताशी २५.२ किती असल्याने उष्णतेच्या झळा असह्य होत्या.

समुद्र आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर असलेला चक्रीय चक्रावात विरून गेला आहे. दरम्यान, राज्यावरील ढगाळ वातावरण मात्र कायम असून, ३० मे ते १ जूनपर्यंत पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. राज्यात इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा खाली होते. मंगळवार आणि बुधवारी जळगाव सर्वाधिक हॉट होते. एका स्थानिक खासगी संकेतस्थळावरील नोंदीनुसार मंगळवारी जळगावात ४२ अंश तर बुधवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

भारत मौसम विभागाच्या अंदाजानुसार ३० मेपर्यंत अआणि पुढे १ जूनपासून पुढचे १५ दिवस पूर्वमोसमी पावसाचे संकेत आहेत.वाऱ्याच्या वेगाने उष्णतेच्या झळा… मंगळवारी वायव्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा ताशी वेग १५ किमी होता. बुधवारी पहाटेपासून वाऱ्याचा वेग वाढून ताशी २५.२ किमीपर्यंत गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी वाऱ्याचा वेग काहीसा कमी होईल पण तापमान तसेच असेल. शुक्रवारनंतर पुन्हा तापमान कमी होऊ शकते.