शनिवार, सप्टेंबर 16, 2023

शाळेतील कर्मचाऱ्यांना मारहाण करून शिक्षिकेचा केला विनयभंग

जळगाव लाईव्ह न्यूज| ६ ऑगस्ट २०२३। शहरातील संभाजी नगरातील एजीसी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये झालेल्या लहान मुलांचे भांडणावरून शाळेचे कर्मचारी व महिला शिक्षिकांना मारहाण करून विनयभंग केल्याची घटना शनिवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , संभाजी नगरातील एजीसी इंग्लिश मिडीअम स्कूल आहे. शाळेतील काही लहान मुलांमध्ये वाद झाल्याने शाळेतील शिक्षिकांनी मुलांच्या पालकांना समजविण्यासाठी शनिवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शाळेत बोलावण्यात आले होते. यावेळी शाळेतील कर्मचार आणि शिक्षिका हे पालकांना समजवित असतांना वाद झाला. त्यात किशोर सुर्यवंशी, राजू सुर्यवंशी, आनंद सुर्यवंशी, छोटू सुर्यवंशी, रोहन सुर्यवंशी यांच्यासह इतर २ ते ३ जणांनी शाळेतील कर्मचारी शेख अय्युब शेख युनसू आणि महिला शिक्षिकांना यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

त्यानंतर एका शिक्षिकेतचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून किशोर सुर्यवंशी, राजू सुर्यवंशी, आनंद सुर्यवंशी, छोटू सुर्यवंशी, रोहन सुर्यवंशी रा. वरणगाव ता.भुसावळ यांच्यासह इतर दोन ते तीन जणांविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.