गुन्हेजळगाव जिल्हा

म्हणून शिक्षकाने शाळेत मुलीचा केला विनयभंग ; जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२४ । महिलासंह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच महिलेने व्याजाची रक्कम न दिल्याने तिच्या मुलीचा ती शिकत असलेल्या शाळेत शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या विद्यार्थिनीसह तिच्या बहिणीला मारून टाकण्याचीही धमकी देण्यात आली. हा प्रकार १२ ते १८ जून दरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात घडला. शिक्षकासह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी महिला गृहउद्योग करते. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी सुवर्णा रामकृष्ण पाटील (रा. खोटेनगर) व वंदना अजय पाटील (रा. श्रद्धा कॉलनी) यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले. त्या बदल्यात त्यांनी आतापर्यंत सहा लाख रुपये दिले, असे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतरही ते पैशासाठी तगादा लावत होते.

एक लाख ४० हजार रुपये बाकी असल्याने १२ जून रोजी सुवर्णा पाटीलसह तिचा पती रामकृष्ण देवराम पाटील, वंदना पाटील व तिचा पती तथा शिक्षक अजय पाटील यांनी महिलेच्या घरी येत गैरवर्तन केले. या प्रकरणी विद्यार्थिनीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २३ जून रोजी सुवर्णा पाटील, रामकृष्ण पाटील, अजय पाटील, वंदना पाटील यांच्याविरुद्ध कलम ३५४, पोक्सो अधिनियम कलम ७, १२, १७, १८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र उगले करीत आहेत.

१८ जून रोजी या महिलेची १४ वर्षीय मुलगी शाळेत गेलेली असताना शिक्षक अजय पाटील याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने घरी सांगितला असता तिच्या आईने सुवर्णा पाटील हिला विचारणा केली, त्यावेळी तिने शिवीगाळ केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button