किळसवाणी घटना : : चौथीतील विद्यार्थिनींवर शिक्षकांनीच केला अत्याचार
जळगाव लाईव्ह न्यूज : ७ एप्रिल २०२३ : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील धामणदरी येथे जिल्हा परीषदेच्या शाळेतील दोन शिक्षकांनी चौथीत शिकणार्या चार विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार केल्याची किळसवाणी घटना उघडकीस आली आहे. संबंधित शिक्षकांना तत्काळ अटक करण्यात आली असून शिक्षक राजेश रामभाऊ तायडे (45), सुधाकर रामदास ढगे (53ए राहणार अकोला) अशी संशयित आरोपी शिक्षकांची नावे आहेत.
धामणदरी येथे जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेची पटसंख्याच 9 आहे. या 9 विद्यार्थांसाठी 2 शिक्षक आहेत. 8 ते 10 वर्षाच्या चार मुली या शाळेत शिकण्यासाठी येत असताना नियत फिरलेल्या नराधम शिक्षकांची वाईट नजर या मुलींवर पडली. गत दोन महिन्यांपासून या विद्यार्थिनीसोबत दोन्ही शिक्षक अश्लील चाळे करायचे. इतकेच नव्हे तर मुलींना एकटे पाहून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्यची बाब उघडकीस आली आहे.
वारंवार घडणार्या या कृत्यामुळे अल्पवयीन मुली भयभीत झाल्या. त्यापैकी एक दोघी शाळेत जाण्यासाठी घाबरत असल्याने पीडीत घरीच थांबल्ली असता, पालकांनी त्यांना शाळेत का जात नाही म्हणून विचारले असता चौघींपैकी एकीने वारंवार घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर या शिक्षकांचे बिंग फुटले.
पालकांनी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता ठाणेदार संजय सोळंके यांनी तत्काळ दोन्ही शिक्षकांना पोलिस ठाण्यात आणले आणि पीडित मुलींच्या तक्रारीवरून त्यांना अटक केली. दरम्यान, दोन्ही शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे.