---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

पारोळाजवळील बायपासवर टँकर उलटला; गॅस गळतीने नागरिकांमध्ये घबराट

gas tankar
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२५ । पारोळा जवळील महामार्गावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसचा टँकर पलटी झाला. त्यातून गॅसची गळती होत असल्यामुळे परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वाहतूक अन्य दिशेने वळविली होती.

gas tankar

या घटनेबाबत असे की, पारोळा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासच्या जवळ रात्रीच्या सुमारास अपघात झाला. यात धुळ्याकडून जळगावकडे जाणारे एक टँकर वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हायवेच्या बाजूला जाऊन उलटले. या अपघातात टँकरमधून गॅसची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

---Advertisement---

या अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आणि अनेक जण आपापल्या घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी गेले. आज सकाळी पोलीस ठाण मांडून बसले असून, अग्नीशामक दलाचा बंब आणि रूग्णवाहिका देखील बोलावण्यात आलेली आहे. अद्यापपर्यंत कोणालाही गॅसचा त्रास झाल्याचे समोर आले नसून परंतु या अपघातात नेमके किती जण जखमी झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---