⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

‘आनंदाचा शिधा’चा गोडवा गुढीपाडव्याला नाहीच

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | दिवाळी प्रमाणेच गुढीपाडवा, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीला घरोघरी आनंदाचा शिधा पोहचवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली होती. मात्र मध्येच सुरु झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका हा योजनेला बसला असून जळगावातील नागरिकांना आनंदाची शिधा मिळवण्यासाठी पुढच्या महिन्याची वाट पहायला लागणार असल्याची माहिती एका रेशन दुकानदारेने ‘जळगाव लाईव्ह’ला दिली आहे.

अधिक माहिती अशी कि, दिवाळी प्रमाणेच गुढीपाडवा, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीला घरोघरी आनंदाचा शिधा, पोहचवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली होती. मात्र मध्येच सुरु झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अजून आनंदाच्या शिधेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही . जिल्ह्यात पाडव्याच्या एक दिवस आधी आनंदाचा शिधा पोहचणे अपेक्षित होते. मात्र अजून आनंदाच्या शिध्याची पाकीट तयार झाले नसल्याचे समोर येत आहे.

पाडवा गोड झालाच नाही
जिल्ह्यात पाढव्याच्या एक दिवस आधी आनंदाचा शिधा पोहचणे अपेक्षित होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेशन दुकाने आहेत, तर शिध्यास पात्र असलेल्या रेशनकार्ड धारकांची संख्या देखील मोठी आहे. पाडवा गोड व्हावा यासाठी हा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.मात्र सरकारी संपामुळे नागरिकांचे हाल होणार हे निश्यित असल्याचे दिसत आहे.