जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । चोरट्यांचे सूत्र सुरूच अजून जिल्ह्यासह ग्रामीण भागात धुमाकूळ घातलाय. चक्क एरंडोल येथील गाढवे गल्लीत भर दिवसा दुकान फोडून रोकड लंपास केल्याची घटना उघडीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एरंडोल पोलिसांत अज्ञात भामट्यानविरुद्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एरंडोल शहरातील गाढवे गल्लीतील दुकानदार महेश सतिश बिर्ला हे २६ रोजी रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी जेवायला गेले. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरांनी दुकानाच्या बाहेर असलेले कुलुप तोडून दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातील सुमारे आठ ते दहा हजार रुपये रोख चोरुन नेले. याबाबत दुकानाच्या मालकांनी सांगितले की, गेल्या दोन तीन दिवसांपासून दुकानातील पैसे गल्ल्यातच होते. संध्याकाळी मी ते घरी घेऊन जाणार होतो. दरम्यान भर वस्तीत असलेले दुकान फुटल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
दुपारी सदर गल्लीतील लोक बहुतांश शेतकरी असल्याने शेतात जातात व काही लोक बाहेर गावी गेले असल्याने त्यांचे देखील घर बंद होती. त्यामुळे गल्लीत शांतता होती. याचा फायदा चोरट्यांनी उचलला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर पोलिसांनी दुकानात येऊन पाहणी केली असल्याचे महेश बिर्ला यांनी सांगितले.