जळगाव जिल्हा

‘गिरणा’तून संक्रांतीला‎ सोडणार दुसरे आवर्तन‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । गिरणाकाठच्या गावांसाठी गिरणा धरणातून १५ जानेवारीला आवर्तन ‎ ‎ सोडण्यात येणार आहे. पाणी‎ आरक्षण आणि कालवा सल्लागार समितीने यावर्षी गिरणेतून दोनऐवजी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय‎ घेतला आहे. त्यातील दुसरे आवर्तन ‎संक्रांतीला सोडले जाणार आहे.

‎गिरणा धरणातून आता १५‎ जानेवारी आणि १ मार्च रोजी तीन आवर्तने सुटणार आहेत. गिरणेच्या पाण्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव,‎ धरणगाव व अमळनेर तालुक्यातील‎ २२२८१ हेक्टर जमिनीला‎ सिंचनासाठी लाभ होणार आहे.‎ याच तालुक्यांमधील १६० गावांना‎ पिण्यासाठीही लाभ होणार आहे. या‎ अनुषंगाने गिरणा धरणातून आवर्तन‎ सोडण्यात येणार आहे. शेती सिंचन‎ आणि बिगर सिंचनासाठी गेल्या‎ महिन्यात ११०.२९ दशलक्ष घनमीटर‎ इतके पाणी सोडण्यात आले आहे.‎

प्रकल्पावर ३८२ गावांचे‎ भवितव्य‎ जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि‎ वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून‎ यावर १३८ गावे अवलंबून आहेत.‎ बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी,‎ अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा‎ आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १०१‎ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु‎ प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो.‎ तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा‎ जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो.‎

१५ जानेवारी रोजी १०६.०४ दशलक्ष‎ घनमीटर इतक्या पाण्याचे दुसरे‎ आवर्तन सुटणार आहे. १ मार्च २०२२‎ रोजी १०६.०४ दशलक्ष घनमीटर‎ आवर्तन सोडण्यात येणार आहे.‎ ‎प्रकल्पावर ३८२ गावांचे‎ भवितव्य‎ जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि‎ वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून‎ यावर १३८ गावे अवलंबून आहेत.‎ बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी,‎ अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा‎ आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १०१‎ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु‎ प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो.‎ तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा‎ जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो.‎

हे देखील वाचा:


Related Articles

Back to top button