तीन गावठी कट्टा व 14 जिवंत काडतुसासह दरोडेखोर जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांच्या नाशिक आयजींच्या पथकासह चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत मुसक्या आवळल्या असून संशयीतांकडून तीन गावठी कट्टे, 14 जिवंत काडतुस व वस्तरा, चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई शनिवार, 28 मे रोजी दुपारी तीन वाजता तेल्या घाटात करण्यात आली तर दोन संशयीत पसार झाले.

दरोड्यापूर्वीच संशयीत जाळ्यात
चोपडा ते बोर अजंटी रस्त्यावर तेल्या घाटाखाली शनिवारी दुपारी 3 वाजता एका पांढर्‍या रंगाच्या स्कार्पिओ (एम.एच.12 एफ.यू.0051) या वाहनातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या गणेश बाबासाहेब केदारे (24, पाडळी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर), कालिदास दत्तात्रय टकले (28, हरताळा, ता.पाथर्डी), विकास अप्पासाहेब गिरी (22, पाडळी, ता.पाथर्डी) यांना अटक करण्यात आली. संशयीताच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे व 14 जिवंत काडतूसे तसेच तीन मोबाईल व दाढी करण्याच्या वस्तरा असा एकूण सहा लाख 34 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर उमर्टी मध्यप्रदेशातील दोन संशयीत पसार झाले. चोपडा ग्रामीण पोलिसांनी संशयीतांना अटक केली असून या प्रकरणी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisements

यांच्या पथकाने केली कारवाई
नाशिक आयजींच्या पथकातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहोम, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, विशेष पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, चोपडा उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, एएसआय बशीर तडवी, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, नारायण लोहरे, चोपडा ग्रामीणचे हवालदार लक्ष्मण शिंमाणे व प्रमोद पारधी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now