---Advertisement---
गुन्हे यावल

यावलजवळ रिक्षाचे टायर फुटून दुचाकीला धडक, दोघे गंभीर

accident
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । यावल शहराकडून फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाविद्यालयाजवळ रिक्षाचे पुढील चाकाचे टायर फूटून दुचाकीला धडक बसली. अपघातात तीन जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

accident

मुक्ताईनगर येथील निवृत्ती पुंडलिक पाटील वय ४२ हे पत्नी शारदा यांच्यासह दुचाकीद्वारे श्री क्षेत्र मनुदेवी येथे दर्शनासाठी जात होते. फैजपूरकडे महेंद्र कोळी वय ३२,रा.अट्रावल हे रिक्षा घेऊन जात असलेल्या रिक्षाचे पुढील चाकाचे टायर फुटून रिक्षाचे नियंत्रण सुटून रिक्षा थेट समोरून येणाऱ्या दुचाकीवर जावून आदळली. यावेळी अपघात होऊन जखमी तिघांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

---Advertisement---

अपघातात रिक्षाचालक महेंद्र कोळी यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तर निवृत्ती पाटील यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर होऊन त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. तसेच शारदा पाटील यांना किरकोळ दुखापत झाली.

जखमींवर डॉक्टर शुभम तिडके, अधिपरिचारिका नेपाली भोळे, आशा आदीवाल, भूषण गाजरे यांनी प्रथमोपचार करून निवृत्ती पाटील यांना तातडीने फैजपूर येथील खासगी रुग्णालयात तर महेंद्र कोळी यास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---