गुरूवार, जून 8, 2023

ठाकरे गटात उरलेले खासदार आणि आमदार लवकरच एकनाथ शिंदें सोबत !

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । ठाकरे गटात सध्या उरले खासदार आणि आमदार हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या सोबत येणार असल्याचा दावा शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

अधिक माहिती अशी कि, ठाकरे गटाच्या खासदारासोबत आमची काल बैठक झाल्याचा दावा तुमाने यांनी केला आहे. हे खासदार आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.आम्ही १३ खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तेच मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. ऊर्वरीत लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप अवकाश असला तरी सर्वच पक्षांची आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्त जागांची मागणी केली आहे. या संदर्भात बोलतांना शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे.