जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत, कुणालाही कळू न देता १६ हजार किंमतीचे दोन मोबाईल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख ईब्राहीम शेख खलील (वय २४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ येथे हा तरुण वास्तव्यास आहेत. शेख इब्राहीम हा २९ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मास्टर कॉलनी परिसरातील चटोरी गल्लीत फिरत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी १० हजार रुपये किंमतीचा पहिला तर ६ हजार रुपये किंमतीचा दुसरा असे एकूण दोन १६ हजार रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी लांबविले.
परिसरात शोध घेवूनही मोबाईल सापडले नाही. त्यानंतर शेख इब्राहीम याने रविवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सय्यद हे करीत आहेत.