⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या वृद्धास भरदिवसा लुटले

भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या वृद्धास भरदिवसा लुटले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । भाजीपाला घेऊन पद्मावती मंगल कार्यलयाकडून घराकडे पायी जात असलेल्या ७१ वर्षीय वृद्धास पाठीमागून आलेल्या तीन युवकांनी लुटल्याची घटना दि.११ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांतीलाल मिश्रीलाल जैन (वय-७१, रा. रणछोड नगर, पंचमुखी हनुमान मंदिराच्यामागे) हे दि.११ सकाळी १० वाजता भाजीपाला व बी.पी. च्या गोळया घेण्यासाठी सिंधी कॉलनी येथे गेले होते. पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील मेडिकलमधून गोळया घेतल्यांनंतर त्यांनी सिंधी कॉलनी येथून भाजीपाला घेतला. त्यानंतर घरी जाण्यासाठी ते रिक्षाने पद्मावती मंगल कार्यालयाजवळ उतरले. तेथून ते घराकडे पायी जात असतांना पाठी मागून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या उजव्या हाताचा दंड धरून थांबविले. त्याचवेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या दोन ३५ ते ४० वर्षीय इसमांनी त्यांना पकडून ठेवत पहिल्या इसमाने त्यांच्या हातातील ८ ग्रॅम वजनाची व २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने चोरून नेली. जैन यांनी लागलीच आरडाओरड केली, मात्र यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. याप्रकरणी कांतीलाल जैन यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिनही अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह