जळगाव जिल्हापाचोरा

खरा इतिहास अभ्यासण्याची गरज : देसले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । मराठा साम्राज्या-विषयी विपर्यस्त लेखन करून खोटा इतिहास व गैरसमज पसरवण्यात आला होता. त्यामुळे मराठा बांधवांनी खऱ्या इतिहासाचा योग्य पद्धतीने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे परखड मत व्याख्याते प्रदीप देसले यांनी व्यक्त केले.

पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित शिव जन्मोत्सव व्याख्यानमाला अंतर्गत २० फेब्रुवारीला ‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर शिव व्याख्याते प्रदीप देसले (भडगाव) यांनी विचार व्यक्त केले. मराठा महासंघाद्वारे छत्रपती शाहू महाराज सामाजिक विकास मंडळ तसेच राजे संभाजी युथ फाउंडेशनच्या सहकार्याने ऑनलाइन शिव जन्मोत्सव व्याख्यानमालेत देसले यांनी पहिले पुष्प गुंफले. या ऑनलाइन व्याख्यानमालेला शेकडो श्रोत्यांनी उपस्थिती नोंदवली. शीतल अकॅडमी व टायगर किड्सचे संचालक प्रा. रोहन पाटील यांनी तंत्र सहाय्य केले. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन तर शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button