अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेले
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव येथील नागदरोड वरील वीट भट्टीवर कामास असलेल्या कुटुंबातील अल्पवयीन तरुणी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. त्या अल्पवयीन मुलीच्या आईने चाळीसगाव पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , नागदरोड वरील नानाभाऊ कुमावत यांच्या वीटभट्टीवर काम असलेल्या एका कुटुंबातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा गेल्या दोन महिन्यांपूर्वीच शहरातील एका तरुणासोबत विवाह झालेला होता. त्यानंतर सदर तरुणी ही आईकडे होती. काल सदर तरुणी गावात बाजार करण्यासाठी गेली. मात्र ती घरी परत आलीच नाही. तिच्या आईने तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने अखेर तिच्या आईने चाळीसगाव पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस स्टेशनला आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.