⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | कृषी | कापसाला किमान भाव हा १२ हजार रूपये मिळावा !

कापसाला किमान भाव हा १२ हजार रूपये मिळावा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । कापसाला किमान भाव हा १२ हजार रूपये इतका मिळावा, तसेच शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी आज युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे याबाबत वेळोवेळी या प्रश्नांबाबत सरकारमधील मंत्री, जिल्हाधिकारी, तसेच तहसिलदारांना निवेदने देऊन, चक्का जाम आंदोलन, रास्ता रोको करूनही याबाबत ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. गेंड्याची कातडी पांघरलेल्या व झोपेचे सोंग घेण्यार्‍या सरकारला व सरकारमधील दुव्यांना याबाबत काहीही पडलेलं नाही. याचमुळे शेतकरी बांधवांच्या या विविध मागण्यांसाठी शेवटचा पर्याय म्हणून जळगांव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शेतकरीपुत्र रविंद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय समोर,जळगांव येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या संध्याकाळी जळगावात येत असून परवा त्यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे कार्यक्रम आहे. या पार्श्‍वभूमिवर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी सुरू केलेले उपोषण हे लक्षवेधी ठरले

author avatar
टीम जळगाव लाईव्ह