⁠ 
सोमवार, मे 27, 2024

समता भातृ मंडळ पिंपरी-चिंचवड आयोजीत लेवा पाटीदार समाजाचा स्नेहमेळावा साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी-चिंचवड । समता भातृ मंडळ पिंपरी-चिंचवड, पुणे.आयोजीत लेवा पाटीदार समाजाचा १ मे २०२४ रोजी २७ वा वर्धापन दिन व स्नेहमेळावा,समता भातृ मंडळ पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने महाराष्ट्र दिन , कामगार दिन या दिवशी, साजरा करण्यात आला. ठिकाण खंडोबा मंदिर आकुर्डी चौक, यावेळी पिंपरी-चिंचवड मधील सर्व लेवा समाज बांधव एकत्र येवुन आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात तसेच एकमेकांनच्या भेटीगाठी होतात

कारण हल्लीच्या धावपळीच्या काळामधे वेळ काढून आपल्या समाजाप्रती कर्तव्य करणे वेळे अभावी शक्य नसते ,म्हणून समता भातृ मंडळातील सर्व पदाधिकारी, मंडळाचे सभासद,व समाजातील लोक मिळून या दिवशी स्वता एकत्र येऊन भोजन तयार करतात ,सांस्कृतीक कार्यक्रम, समाज्यातील उद्योजक, सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिक मुलं, मुली महीला व वारकरी यांचे सत्कार आयोजित केले जातात.

नवीन पिढीला यामुळे प्रेरणा मिळते, यावेळी कार्यक्रम ला 2000 पेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती राहून एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतात , समाज एकत्रित राहील्या मुळे समाजाला कसे फायदे होतात , तसेच नवीन पिढीला सुंदर असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले,व आपले मोलाचे विचार मांडले , समाजातील महिलांनी सुंदर अशा प्रकारे गणेशवंदना सादर करण्यात आली , आमच्या भगिनींनीच सूत्रसंचालन केले ,अशा प्रकारे समता भातृ मंडळातील सर्व पदाधिकारी याच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, तसेच या कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले.