---Advertisement---
जळगाव जिल्हा चोपडा

१ जानेवारीला सुरू होणारा खेडी-भोकर पूल अजूनही थंडबस्त्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील खेडी भोकरी व जळगाव तालुक्यातील भोकर दरम्यानचा तापी नदिवरील हंगामी लाकडी पूल बनविण्यास डिसेंबर महिन्यात सुरूवात होत असते. दरवर्षी दि. १ जानेवारी ते दि. ३१ मे पर्यंत हा पुल वापरास खुला करण्यात येत असतो. परंतु अद्याप या पुलाचे काम थंडबस्त्यात असल्याने या मार्गाने ये-जा करणारे वाहनधारक,चालक व पादचारी यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हा पूल त्वरीत बनविण्यात यावा,अशी आग्रही मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

kheli bhokar pul jpg webp

ह्या पुलावरून चोपडा व्हाया भोकर मार्गे जळगाव जाताना वेळ व पैशांची बचत होत असल्याने खान्देशसह मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील खाजगी व सरकारी वाहनधारक चालक ह्याच मार्गाने जाणे पसंत करतात. हा पूल बनवण्यासाठी संबंधित विभागामार्फत दरवर्षी लाखोंचा निधी मंजूर होत असतो. परंतु सालाबाद प्रमाणे यावर्षी हा पूल सुरू न झाल्याने तापी नदिकाठावरील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने ह्या हंगामी लाकडी पुलाचे काम त्वरित सुरू करावे. अन्यथा तापी नदीपात्रात पंचक्रोशितील ग्रामस्थांतर्फे लवकरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी दिला आहे.

---Advertisement---

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---