⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सावद्याला नियमावलीनुसार भोंगे बंद ठेवणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । सावदा शहरात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद ठेवण्याचा निर्णय मुस्लिम व हिंदू बांधवांनी शुक्रवारी सकाळी व संध्याकाळी झालेल्या बैठकींमध्ये घेतला.

अधिक माहिती अशी की, पोलिसांनी मुस्लिम व हिंदू समाजाच्या प्रतिष्ठांची वेगवेगळी बैठक घेतली. त्यात विठ्ठल मंदिराचे राजेंद्र चौधरी, राधाकृष्ण मंदिराचे श्याम पाटील, गणपती मंदिराचे चंद्रकांत पाटील, स्वामीनारायण मंदिरातर्फे शास्त्री राजेंद्रप्रसाद दासजी, मरीमाता मंदिराचे प्रमोद तेली व बाळू किनगे, खंडेराव वाडीचे नोमादास भंगाळे, दुर्गा माता मंदिराचे संतोष शुक्ल यांचा समावेश हाेता. सहाय्यक पाेलिस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या उपस्थितीत सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व शासनाच्या नियमावलीचे पालन करू. भोंगे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.