जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । उच्च सुशिक्षित तरुणाचे घरात किरकोळ वाद झाले. या संतापाच्या भरात तापी नदीकडे आत्महत्येसाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांनी जीवदान दिले. ३१ डिसेंबरला रात्री १० वाजेच्या सुमारास यावल रोडवर हा प्रकार घडला. येथील शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे व पोलिसांनी या तरुणाचे मतपरिवर्तन करुन वडिलांच्या स्वाधीन केले.
यावल रोडवरील एका उच्चभ्रू वस्तीमधील सुशिक्षित तरुणाचे घरात किरकोळ भांडण झाले. या रागातून तो तापीपुलावरुन आत्महत्या करण्यासाठी घरातून निघाला. त्याच्या पाठोपाठ त्याचे शासकीय सेवेतून निवृत्त झालेले वडील घराबाहेर पडले. यावल रोडवर त्याला थांबवून वडिलांनी मनधरणी केली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या तरुणाने तापी नदीकडे जात आत्महत्या करणाच, अशी धमकी भरली. या दरम्यान ३१ डिसेंबर मुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे हे देखील तेथे पोहोचले. तरुणाच्या वडिलांनी त्यांना हतबलतेने हा प्रकार सांगताच. इंगळे यांनी पाठलाग करुन तरुणाला थांबवले. तब्बल अर्धा या तरुणाचे प्रबोधन केले. त्याचा राग कमी झाल्यावर इंगळेंनी त्याच्याकडून शिक्षण व परिवाराची स्थिती जाणून घेतली. यानंतर त्याला वडिलांच्या स्वाधीन केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..