भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंना दिलासा नाहीच ! हायकोर्टाने ती याचिका फेटाळली
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२४ । भोसरी येथील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना हायकोर्टाने धक्का दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी खडसेंना दिलासा देण्यास नकार दिला आहे. खडसे यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. याचा अर्थ असा नाही की खटला चालू शकत नाही
ट्रायल कोर्टाला पुन्हा तपास करण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कथित भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. एप्रिल २०१८ ला पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र ऑक्टोबर २०२२ मध्ये क्लोजर रिपोर्ट मागे घेण्यात आला होता.
क्लोजर रिपोर्ट स्वीकारून देखील ऑक्टोबर २०२२ ला पोलिसांना पुन्हा तपास करण्याची परवानगी देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तत्कालीन मंत्री असल्याने खटला चालवण्यापूर्वी योग्य ती परवानगी न घेतल्याने गुन्हा रद्द करण्याची खडसेंनी मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे.