⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | मयतांच्या वारसांना मिळाली आर्थिक मदत

मयतांच्या वारसांना मिळाली आर्थिक मदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यातील मयतांच्या वारसांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळाली. ही मदत आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते 18 मयत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 20 हजारांचे धनादेश वितरित करण्यात आले.

अमळनेर तहसील कार्यालयात सदर धनादेश वितरित करण्यात आले, यावेळी तहसिलदार मिलिंदकुमार वाघ व इतर अधिकारी उपस्थित होते, सदर योजनेंतर्गत याआधी देखील अनेक पीडितांना आर्थिक मदत मिळाली असून आता 18 मयत व्यक्तींच्या वारसांना ही मदत मिळाली आहे, सदर धनादेश स्वीकारण्यासाठी मयत व्यक्तींचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी मयत सुरेश दिलीप पवार यांचे वारस रेखाबाई सुरेश पवार रा.अमळनेर, मयत भिमराव सुकदेव मोरे यांचे वारस रेणुका भिमराव मोरे रा.वावडे, मयत शामकांत प्रदीप सोनवणे यांचे वारस शितल शामकांत सोनवणे रा.सोनखेडी, मयत अशोक चैत्राम पाटील यांचे वारस कल्पनाबाई अशोक पाटील रा.ढेकुसिम, मयत प्रदिप सुकदेव मालचे- भिल यांचे वारस सुनिता प्रदिप भिल रा.बोहरे, मयत भगवान मधुकर धोबी यांचे वारस अनिता भगवान धोबी रा.अमळनेर, मयत दिनेश श्रीराम पाटील यांचे वारस मिना दिनेश पाटील रा.दहिवद, मयत अर्जुन देवराम पाटील यांचे वारस मीनाबाई अर्जुन पाटील रा.अटाळे, मयत बापू भावडू भिल यांचे वारस मीनाबाई बापू भिल रा.इंदापिंप्री, मयत भिका गंगा वडर यांचे वारस भागाबाई भिका वडर रा.मारवड, मयत शैलेश नथ्थु भावसार यांचे वारस पुजा शैलेश भावसार रा.अमळनेर, मयत शरद गोरख वाल्हे यांचे वारस सुरेखा शरद धोबी रा.अमळगाव, मयत अल्ताफ सत्तार शेख यांचे वारस सायराबी अल्ताफ शेख रा.अमळनेर, मयत सतिलाल मधुकर सुतार यांचे वारस मधुकर धोंडू सुतार रा.जैतपिर, मयत दिलीप अशोक पाटील यांचे वारस शितल दिलीप पाटील ता.अमळनेर, मयत गजानन निंबा सोनार यांचे वारस वैशाली गजानन सोनार रा.दहिवद, मयत मनोहर पुंडलिक सूर्यवंशी यांचे वारस प्रमिला मनोहर सूर्यवंशी रा.गांधली, मयत आत्माराम चतुर कोळी यांचे वारस सुनिता आत्माराम कोळी रा.पाडसे आदींना धनादेश देण्यात आले. सदर मदतीबद्दल सर्व उपस्थितांनी आमदारांसह शासनाचे आभार व्यक्त केले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह