---Advertisement---
धरणगाव जळगाव जिल्हा

ममुराबादच्या पुरग्रस्त कुटुबांच्या मदतीला धावले पालकमंत्री; जीवनावश्यक वस्तूंसह दिला एक महिन्याचा किरणा

---Advertisement---

जळगाव : गेल्या महिन्यात ममुराबाद येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे घरातील धान्यांसह जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नागरिकांच्या मदतीला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील धावून आले आहेत. नुकसानग्रस्त कुटुबियांना एक महिन्याच्या किराण्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांना मदतीचा हात दिला.

gulabbhau mamurabad news jpg webp

गेल्या महिन्यात जळगाव शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात ममुराबाद येथील खंडेरावनगर भागातील चार घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे गरिब शेतकरी कुटुंबाच्या घरातील धान्य ओलं झालं होतं. यामुळे या कुटुंबियांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं होतं. या संकटात ना.गुलाबराव पाटील त्यांच्या मदतीला धावून आले.

---Advertisement---

पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, सरपंच हेमंत चौधरी, माजी सरपंच महेश चौधरी, संतोष कोळी, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, माजी सदस्य शरद पाटील, राहुल ढाके, शिवसेना गट प्रमुख किरण पाटील यांनी पालकमंत्र्यांच्यातर्फे सर्व नुकसानग्रस्त कुटुबांना तेल, साखर, शेंगदाणे, पीठासह एक महिन्याचा किरणा व जीवनावश्यक वाटप केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---